लाकूड व कोळशावर स्वयंपाक केल्याने वाढतो श्वसनविकार

शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (00:05 IST)
लाकूड वा कोळशाच्या धगीवर खाद्यपदार्थ भाजून खाणे अनेकांना आवडते. पण एका अध्ययनातून असा दावा करण्यात आला आहे की, अशा प्रकारची पसंती तुमच्या फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. लाकूड व कोळशावर भाजलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने श्र्वसनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकते. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, स्वयंपाकासाठी लाकूड व कोळशाचा वापर करणार्‍या लोकांमध्ये श्र्वसनासंबंधी आजार जडण्याचा धोका 36 टक्के जास्त असल्याचे आढळून आले. शास्त्रज्ञ झेंगमिंग चेन यांनी सांगितले की, लाकूड वा कोळसा जाळल्याने श्र्वसनविकारांचा धोका वाढत आहे. हा धोका स्वच्छ इंधनाच्या वापरामुळे कमी केला जाऊ शकतो. भारतासारख्या देशांमध्ये स्वयंपाकासाठी लाकूड व कोळशासारखे ठोस इंधन जाळले जाते. ज्यांच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणावर सोडले जाणारे प्रदूषक कण आपल्या फुफ्फुसात जातात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती