आपल्या गल्ली, रस्ता, पब्लिक ट्रांसपोर्ट, रेस्टॉरंट्स सारख्या अनेक जागांवर लोकं बिंदास सिगारेट ओढताना दिसतात. वर्क प्लेसवर देखील लोक यासाठी जागा शोधून घेतात. अशात आपल्या जवळपास उभारून सिगारेट ओढणार्याचा धूर आपल्यापर्यंत पोहचत असल्यास आपण पॅसिव्ह स्मोकर आहात. डॉक्टर्सप्रमाणे पॅसिव्ह स्मोकिंग देखील अॅक्टिव्ह स्मोकिंग एवढी धोकादायक आहे.
एक्सपर्ट्सप्रमाणे पॅसिव्ह स्मोकर्सला फुफ्फुसे, मान आणि शिर याच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो. हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि फुफ्फुसे संबंधी आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पॅसिव्ह स्मोकिंगहून वाचण्यासाठी आपल्याला स्वत:ला सजग होण्याची गरज आहे. जवळपास कोणी सिगारेट ओढत असेल तर त्याला असे करण्यापासून रोखावे. असे करणे शक्य नसल्यास त्या जागेवरून लांब जावे किंवा रुमालाने आपलं नाक झाकावं. कोणाही घरात सिगारेट ओढण्याची परवानगी देऊ नये. एखाद्या रेस्टॉरंट्स, मॉल, सिनेमा हॉलमध्ये कोणी स्मोक करत असेल तर तक्रार करावी. अशाने आपण स्वत:ची आणि इतरांची मदत कराल.