औषधांसाठी आता फुलांचा वापर

गुलाबाच्या नियमित सेवानाने रंग उजळतो. हृदयाची धडधड कमी होते, रक्त मूळव्याध व श्वेतप्रदर कमी होतो,  निद्रानाश, उन्माद, नेत्ररोग आणि मूत्रव्याधी गुलाब पाण्याने कमी होतात. गुलकंदामुळे उन्हाळ्याचा त्रास घटतो.
 


WD

चाफ्याची फुले ज्वरहर, उत्तेजक, दाहनाशक आणि नेत्र ज्योतिवर्धक असतात. रक्तविकार आणि विषबाधेतसुद्धा यांचा लेप लाभदायक असतो.


WD

कमळाच्या फुलाचे सरबत घेतल्याने चेहरा खुलतो. चेहेर्‍यावरील यौवनपिटीका कमी होतात, त्वचा नितळ होते, तृष्णा, दा‍ह व रक्तविकारात आराम होतो.


WD

पारिजातकाच्या पानांचा रस ज्वर आणि वात रोगात गुणकारी असतो. याचा काढा कंबरेच्या दुखण्यावर फायदेशीर असतो. ही फुले वातहर व केसांसाठी लाभदायी असतात.


WD

जुईच्या फुलांचे चूर्ण किंवा गुलकंद आम्लपित्त व पोटाच्या अल्सरवर गुणकारी असते. जुई शीतल, पित्तनाशक, दंतरोग, नेत्ररोग निवारक असते.


WD

हृदयरोगासाठी सूर्यफुलाचे तेल चांगले असते. रक्तविकार, योनीशूल, यकृतरोग आणि फुफ्फुसांच्या विकारात सूर्यफुलांचा चांगला उपयोग होतो.


WD

जास्वंदाची फुले मलरोधक, केशवर्धक असतात. फुलांचा रस केसांना लावल्यास केसांचा पांढरेपणा कमी होतो. ही फुले तुपात तळून खाल्ली तर श्वेतप्रदर विकारात आराम होतो. फुलांचे पाणी घेतल्यास मळमळ, आम्लपित्त, वमन यासाठी लाभ होतो.


WD

केवड्याची फुले शीतल, कांतिदायक, वेदना निवारक, चर्मरोग दूर करणारी आणि डोळ्यांसाठी गुणकारी ‍असतात. रक्तप्रदर, मायग्रेनमध्ये लाभदायक. फुलांचा रस कानासाठी चांगला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती