पावसाळ्यात उगवणाऱ्या ‘या’ वनस्पतीचे औषधी उपयोग माहित आहेत का?

सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (14:02 IST)
कानफुटीची वेल पावसाळ्यात उगवते. या वेलीची पाने कडुलिंबाच्या पानासारखी कातरलेली असतात. कानफुटीच्या वेलीला फुले पांढरी येतात. ती तीन तीन अशी एकत्र असतात. याची फळेही औषधी आहेतती तीन धारी आहेत.यात तिन कप्पे असतात यात प्रत्येकी तीनतीन बिया असतात. त्यावर पांढरे ठिपके असतात. कानफुटीची मुळे पांढरी असतात.
कान फूटला असता कानफुटीची पाने ठेचून बांधतात किंवा या पानांचा रस कानातून पू घाण निघत असेल किंवा कान फुटला असेल तर घालतात. कानास अप्रतिम औषध आहे.
शौचाला साफ – कानफुटीच्या पानांचा रस दोन छोटे चमचे पोटात घेतला असता या पर्णरसाच्या सेवनामुळे परसाकडे साफ होते.
आमवातावर – आमवातामुळे शरीरास आलेला जडपणा नाहीसा करण्यासाठी कानफुटीची पाने ठेचून अर्धा लिटर पाण्यात त्याचा एक अष्टमांश उरेल इतका काढा करावा व तो आमवतात सकाळ-संध्याकाळ एकेक चमचा रोज घ्यावा. त्याने बरे वाटते. आमवातात तर हा अगदी अप्रतिम औषधोपचार आहे.
मूत्र रोगावर – कानफुटीच्या जुलाबान लघवी तुंबली असेल तर ती साफ होते.
मूतखडा – कानफुटीच्या जुलाबाने मूतखडाही बरा होतो.
संधीवातात – कानफुटीची पाने ठेचून अर्धा लिटर पाण्यात त्याचा एक अष्टमांश उरेल इतका काढा करावा व तो आमवातात सकाळ-संध्याकाळ एकेक चमचा रोज घ्यावा. त्याने बरे वाटते.
आर्तवजन्यरोगावर – कानफुटीची पान व वेखंड ही समभाग चूर्ण करून एक छोटा चमचा सकाळ व संध्याकाळ घेतल्यास ताबडतोब गुण येतो व आर्तवजन्य सर्व रोग बरे होतात.
पोटदूखीवर – कानफुटीच्या पानांचा रस दोन छोटे चमचे पोटात घेतला असता या पर्णरसाच्या सेवनामुळे पोटदूखी बरी होते. अशाप्रकारे कानफूटी ही अतिशय उपयुक्‍त वनौषधी आहे.
 
साभार : सुजाता गानू

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती