सरत्या वयात कोलोन कर्करोग किती धोकादायक आहे, याची मुख्य कारणे आणि संरक्षणाच्या पद्धती जाणून घेऊ या...
सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (16:59 IST)
कोलोन कर्करोगाबद्दल बोलताना, जागतिक आरोग्य संघटना(WHO) आणि अमेरिकेचे सीडीसी(CDC) असे म्हणतात की फुफ्फुसांच्या कर्करोगानंतर जगातील दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. चला, जाणून घेऊ या हा रोग किती धोकादायक आहे-
कोलोरेक्टल कर्करोग म्हणजे काय ?
आतड्यांचा कर्करोग आणि गुदाशयाचा कर्करोग एकाच वेळी उद्भवू शकतात, याला कोलोरेक्टल कर्करोग म्हटले जाते. गुदाशय कर्करोग गुदाशयात उद्भवतो, जो गुदा जवळील मोठ्या आतड्यांचा एक भाग असतो. कोलोरेक्टल कर्करोगाची बहुतेक प्रकरणे अडेनोमाटोस पॉलिप्स (adenomatous polyps) नावांच्या लहान पेशी कर्करोगमुक्त गुच्छांच्या स्वरूपात सुरू होतात. कालांतराने या पैकी काही पॉलीप्स कोलेरेक्टल कर्करोगाचे बनतात.
पॉलीप्स आकारात लहान असतात,त्यांचा असण्याची लक्षणे सहसा दिसून येत नाही. म्हणून डॉक्टर नियमाने चाचणी करण्याचा सल्ला देतात. या चाचण्या कोलन कर्करोग होण्याचा पूर्वीच पॉलीप्स ओळखतात आणि कोलोरेक्टल कर्करोग रोखण्यास मदत करतात.
कोलोनच्या संसर्गाची कारणे -
कोलायटिस संसर्ग विषाणू, बॅक्टेरिया आणि परजीवी (पॅरासाइट्स) हे कोलोन संसर्गाला कारणीभूत असू शकतात. जेव्हा आपण एखादी गोष्ट खातो जी शरीरास पचनास अवघड असते, तर पचनाच्या दरम्यान गुदाशयात अनेक प्रकारचे रसायन तयार होतात, जे संसर्गाला कारणीभूत ठरतात. या व्यतिरिक्त चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे देखील हे शक्य आहे. मांसाहार जास्त प्रमाणात खाणे, फायबर कमी खाणे, याचे मुख्य कारणे असू शकतात. अभ्यासातून असे आढळले आहे की कोलोरेक्टेल कर्करोग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका वाढविण्यात धूम्रपान विशेष भूमिका बजावत.
कोलोन कर्करोग पासून बचाव -
विशेषतः जर आपल्याला या पूर्वी कोलोरेक्टेल कर्करोग झाला असल्यास, आपले वय 60 वर्षापेक्षा जास्त असल्यास, या प्रकारच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास आहे, आपण क्रोहंन रोगाने ग्रस्त आहात. काही तज्ज्ञांचे मत असे आहे की वयाच्या 50 व्या वर्षानंतर तपासणी सुरू करवावी.
- सुनिश्चित करावं की आपल्या आहारात पुरेसे फायबर, भाज्या आणि चांगल्या प्रतीचे कर्बोदके असावं. लाल मांस आणि प्रक्रिया केलेले मांसाच्या सेवनाला आळा घाला किंवा घेणं बंद करा. संतृप्त चरबीच्या ऐवजी चांगल्या प्रतीचे वसा, जसे की एवाकाडो, ऑलिव्ह तेल, मासोळीचे तेल आणि सुके मेवे घ्यावे. तथापि, या अभ्यासानुसार असे आढळते की शाकाहारी व्यक्तींमध्ये कर्करोगाचा धोका कमी असतो, परंतु कोलोरेक्टेल कर्करोग होण्याचा धोका मांसाहारी लोकांपेक्षा जास्त असतो.
- नियमित व्यायाम करा. दररोज थोडं थोडं व्यायाम केल्याने कोलोरेक्टेल कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.
- आपल्या शरीराचे वजन संतुलित करा. जास्त वजन वाढल्याने किंवा लठ्ठपणामुळे एखाद्या व्यक्तीला कोलोरेक्टेल कर्करोगा सह इतर कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
- जर आपणांस गुदाशयात कोणत्याही प्रकाराची जळजळ, वेदना, किंवा कोणत्याही प्रकाराची अस्वस्थता जाणवत असल्यास त्वरितच डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि तपासणी करवावी. सुरुवातीला या रोगाच्या धोक्याला बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकतं.