हॉलिवूड सुपरस्टार चॅडविक बोसमन यांचं शुक्रवारी निधन झालं. माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरनुसार, बोसमन यांच्या ट्विटर अकाउंटवरुन करण्यात आलेलं अखेरचं ट्विट आतापर्यंतचं ट्विटरवरील सर्वाधिक लाइक मिळालेलं ट्विट ठरलं आहे. बोसमन यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एक स्टेटमेंट जारी करण्यासाठी हे ट्विट केलं होतं. या ट्विटला अवघ्या तासाभरातच एक दशलक्षपेक्षा जास्त लाइक मिळाले, तर २४ तासांपेक्षा कमी वेळेत हे ट्विटच्या इतिहासातील सर्वाधिक लाइक मिळालेलं ट्विट ठरलं आहे.
या ट्विटमध्ये चॅडविक बोसमन यांचा हसतानाचा एक फोटो आणि त्यासोबत एक संदेश आहे. त्यात चॅडविक बोसमन यांच्या निधनाची माहिती देण्यात आली असून त्यांना २०१६ मध्येच स्टेज ३ कोलोन कँन्सरने ग्रासलं होतं. गेल्या चार वर्षांपासून ते कर्करोगाशी लढाई देत होते पण कॅन्सर स्टेज-4 पर्यंत आला होता, असं नमूद केलं आहे. यामध्ये किमोथेरेपी आणि सर्जरी झाल्यानंतर लगेचच चॅडविक यांनी कशाप्रकारे अनेक सिनेमांसाठी शूटींग केलं, याबाबत सांगण्यात आलं आहे.