कोरोना काळात, लोक चांगला आहार घेत आहेत. जेणेकरून या साथीच्या आजाराला बळी पडू नये. अनेक लोकांना आपल्या लाइफस्टाइलमध्ये काही बदल केले आहे. बहुतेक भविष्यात देखील हे बदल सुरु राहतील. कोरोना व्हायरसच्या संक्रमण दरात कमी आली असली तरी सावध राहणे गरजेचे आहे. सोबतच कोरोना रुग्णांना डॉ द्वारे ग्लूकोजचे प्रमाण कमी करण्यासाठी तसंच प्रोटीन डायट वाढवण्याचा सल्ला दिला जात आहे. जाणून घ्या यामागील कारण-
कोव्हिड रुग्णांना कोरोनावर उपचार देताना लवकर रिकव्हरीसाठी आणि संसर्ग पसरू नये यासाठी स्टेरॉयड दिलं जात आहे. या औषधाने रुग्ण बरे होत आहे परंतू यामुळे एक नवीन आजाराला जन्म मिळत आहे. ज्याला म्युकर मायकोसिस अर्थात ब्लॅक फंगल इंफेक्शन म्हटलं जात आहे. हे नाकापासून सुरु होऊन तोंडात होत मेंदू पर्यंत पोहचतं.
प्रथिने आहार वाढविणे का महत्वाचे आहे-
प्रथिनेची कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. जेव्हा प्रथिनेची कमतरता सुरू होते तेव्हा रक्ताची कमतरता वाढते. कोरोना काळा म्हणूनच प्रोटिनचे प्रमाण वाढविण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रोटीनच्या कमतरतेमुळे सांधेदुखीची समस्या देखील वाढते, ज्यामुळे स्नायू ताठ होऊ लागतात. त्याच वेळी, प्रथिनांच्या अभावामुळे मुलांमध्ये फारच कमी विकास होत आहे.
प्रोटीन काय खाऊ शकतो?
मनुका, पेरू, खूजर, मनुका, आलूबुखारा, तूर, उडीद मूग, चणा, हरभरा यांचे सेवन करावे. रोज वेगवेगळ्या डाळीचा आहारात वापर करावा.