पोस्ट कोविड टेस्ट, कोरोनातून बरे झाल्यानंतर कोणत्या टेस्ट आवश्यक जाणून घ्या

गुरूवार, 13 मे 2021 (09:54 IST)
कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देशात थैमान मांडले आहे. या परिस्थितीत संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशात कोरोनातून बरे झाल्यावर रुग्णांनी काय करावे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. कोरोनातून बाहेर पडल्यावर काय काळजी घ्यावी, कोणत्या टेस्ट कराव्या जाणून घ्या- 
 
का आवश्यक आहे पोस्ट कोविड टेस्ट –
SARS-COV-2 चा वायरल लोड कमी झाल्यानंतर सुद्धा त्याचे साईड इफेक्ट शरीरात मोठ्या कालवधीपर्यंत राहतात. कोविड-19 व्हायरस प्रमुख अवयवांचे नुकसान करुन इम्यून सिस्टम बाधित करतो. ब्लड आणि इम्यून सिस्टमची स्थिती आपल्याला व्हायरसचा शरीरावर काय प्रभाव पडला आहे जाणून घेण्यात मदत करते. यासाठी टेस्ट आणि स्कॅन आवश्यक आहे. म्हणून कोरोनातून रिकव्हर झाल्यावर काही खास टेस्ट नक्की करवावे-
 
igG अँटीबॉडी टेस्ट –
इन्फेक्शनशी लढाईनंतर शरीर अशी अँटीबॉडीज उत्पन्न करतं ज्याने भविष्यात इन्फेक्शनपासून बचाव होऊ शकतो. शरीरात अँटीबॉडी लेव्हल समजल्यानंतर प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी उपयोगी ठरू शकते.
 
कधी करावी टेस्ट –
सामान्यपणे अँटीबॉडीज बनवण्यासाठी एक ते दोन आडवड्याचा वेळ लागतो. जर आपल्याला प्लाझ्मा डोनेट करायचा असेल तर रिकव्हरीच्या एका महिन्यातच टेस्ट करा.
 
सीबीसी टेस्ट –
कम्प्लीट ब्लड काऊंट (सीबीसी) टेस्ट शरीरात विविध प्रकारच्या पेशींच्या तपासणीसाठी केली जाते. याने संक्रमणाविरुद्ध शरीराची प्रतिक्रिया समजते. कोरोनातून रिकव्हरीनंतर ही टेस्ट नक्की करावी.
 
ग्लूकोज, कॉलेस्ट्रोल टेस्ट –
कोरोना इंफ्लेमेशन आणि क्लॉटिंगची समस्या सुद्धा निर्माण होऊ शकते, अशात काही रूग्णांमध्ये ब्लड ग्लूकोज आणि ब्लड प्रेशर लेव्हलमध्ये मोठा चढ-उतार दिसून येतो. 
 
जर रुग्णाला डायबिटीज, कॉलेस्ट्रोल किंवा कार्डिएकशी संबंधीत समस्या असेल तर रिकव्हरीनंतर याची एक रूटीन टेस्टसुद्धा करून घ्यावी. जास्त गंभीर लक्षणाच्या रुग्णांना क्रिएटिनिन, लिव्हर आणि किडनी फंक्शन टेस्टचा सुद्धा सल्ला दिला जातो.
 
न्यूरो फंक्शन टेस्ट –
काही कोरोना रुग्णांना रिकव्हरीच्या काही दिवसांनंतर न्यूरोलॉजिकल आणि सायकॉलॉजिकल समस्या दिसून येत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे, यासाठी मेडिकल एक्सपर्ट रिकव्हरीच्या एका आठवड्यानंतर ब्रेन आणि न्यूरोलॉजिकल फंक्शन टेस्ट करण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण कोरोनामध्ये ब्रेन फॉग, एन्जाइटी, थरथरणे आणि बेशुद्धीसारखी सुद्धा लक्षणे दिसून आली आहेत.
 
व्हिटॅमिन-डी टेस्ट –
विटामिन-डी इम्यून सिस्टमला सर्पोट करणारं एक खास न्यूट्रिशन आहे. रिकव्हरी दरम्यान याचे खूप महत्त्व आहे म्हणून व्हिटॅमिन डी ची कमतरता भरुन काढण्यासाठी एकदा टेस्ट नक्की करावी.
 
चेस्ट स्कॅन –
व्हायरसचा नवीन स्ट्रेन समोर आल्यावर HRCT स्कॅनचा सल्ला दिला जात आहे. तरी या स्कॅनिंगची सर्वांना आवश्यकता नाही. अनेक प्रकरणात टेस्टमध्ये कोरोना निगेटिव्ह येत असून लक्षणं दिसत असल्यास स्कॅ‍नची गरज भासते. सीटी स्कॅन आणि लंग्ज फंक्शन टेस्टमध्ये रिकव्हरीनंतर योग्य ठरतं. रिकव्हरीच्या 3-6 महिन्यानंतर विशेष काळजी घेतली पाहिजे.
 
हार्ट इमेजिंग आणि कार्डिएक स्क्रीनिंग –
कोविड-19 शरीरात धोकादायक इन्फ्लेमेशनच्या समस्येला ट्रिगर करतो. अशात अनेकदा हृदयाच्या मांसपेशी कमजोर पडतात. ही रिकव्हर झालेल्या रूग्णांमध्ये आढळलेल्या सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहे. यासाठी कोरोनाने गंभीर प्रकारे आजारी पडलेल्या लोकांनी एक प्रॉपर इमेजिंग स्कॅन आणि हार्ट फंक्शन टेस्ट करावी. छातीत वेदना होत असल्याची तक्रार असणार्‍या रुग्णांनी डॉक्टरच्या सल्ल्याने शेड्यूल टेस्ट केली पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती