धाप लागण्याच्या समस्येने त्रासलेला आहात हे जाणून घ्या.
सोमवार, 10 मे 2021 (21:37 IST)
आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरातील, कुटूंबातील किंवा नातेवाईकांना धाप लागण्याची किंवा श्वास लागण्याची समस्या अनुभवताना पाहिले असेल. धाप किंवा श्वास लागणे म्हणजे ते घेण्यास अडचण होणं . ही समस्या खाली नमूद केलेल्या कोणत्याही कारणामुळे होऊ शकते. चला जाणून घेऊ या.
1 ज्या स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होतो आणि ज्या स्त्रिया अशक्तपणाने ग्रस्त आहेत, म्हणजेच अशक्तपणाचा त्रास असतो. तर हे श्वास किंवा धाप लागण्याचे मुख्य कारण असू शकत.
2 बऱ्याचदा लठ्ठ लोकांची तक्रार असते. की पायऱ्या चढल्यावर त्यांना धाप लागते. म्हणून लठ्ठपणावर नियंत्रण ठेवल्यास श्वासोच्छवासाची ही समस्या टाळता येऊ शकते.
3 श्वसनमार्गाच्या आणि त्याच्या शाखांमध्ये सूज येणे देखील धाप लागण्याच्या समस्येचे एक कारण आहे.
4 फुफ्फुसांशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवली तरीही श्वास घेण्यात अडचण होऊ शकते. कधीकधी बाह्य ऑक्सिजन शोषण्याची फुफ्फुसांची क्षमता कमी होते आणि थोडं चालल्यावर श्वास लागतो.
5 हृदयाशी संबंधित त्रास असणे देखील धाप लागण्याचे हे एक कारण आहे.
श्वासाचा त्रास टाळण्यासाठी या गोष्टींचे अनुसरण करा -
1 नियमित व्यायामाचा आपल्या दिनक्रमात समावेश करण्याचा प्रयत्न करा, आपण लहान वयातच व्यायामाचा जितका चांगला अवलंब कराल आपल्या साठी ते चांगले ठरेल.
2 थोड्या वेळ सूर्यप्रकाश घ्या आणि धुळीपासून दूर राहा.
3 कोणत्याही परिस्थितीत लठ्ठपणा वाढू देऊ नका.
4 दररोज सुमारे 350 ग्रॅम सॅलॅड आणि 350 ग्रॅम फळांचे सेवन करा.प्रथिने भरपूर घ्या. पालेभाज्या नियमित घ्या. कोणत्याही प्रकारचे धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन करणे टाळा आणि मद्यपान करू नका.