'क' जीवनसत्वयुक्त पूरक औषधे म्हणजे सप्लिमेंट्सच्या अतिरेकामुळे पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी निर्माण होतात. दिवसभरात 2000 मिलिग्रॅमपेक्षा अधिक क्षम तेची 'क' जीवनसत्त्वयुक्त पूरक औषधे घेतल्यास जुलाब, मळमळणे, अॅसिड रिफ्लक्ससारख्या समस्या उद्भवू शकतात.
*'क' जीवनसत्त्व शरीराला लोह शोषून घ्यायला मदत करते. या जीवनसत्त्वाच्या अतिसेवनामुळे शरीर लोहही अधिक प्रमाणात शोषून घेईल. लोहाच्या अतिप्रमाणामुळे यकृत, हृदय, थायरॉइड, स्वादुपिंड तसेच मज्जासंस्था यांना नुकसान पोहचू शकते.
* 'क' जीवनसत्त्वाचे अतिसेवन टाळण्यासाठी सप्लिमेंट्स घेऊ नयेत. लिंबू, संत्र, मोसंबी, टोमॅटो, पेरु अशा 'क' जीवनसत्त्वाच्या नैसर्गिक स्रोतांवर अवलंबून राहिल्यास या घटकाचे अतिसेवन टाळता येते.