पायर्‍या चढताना श्वास लागत असल्यास नक्की वाचा

शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (08:41 IST)
पायऱ्या चढताना आपल्याला धाप लागतं असल्यास, आपल्याला अकारण थकवा येत असल्यास, तर शरीरात रक्ताची कमतरता म्हणजे ही अशक्तपणाची लक्षणं पैकी एक आहे. जेव्हा शरीरात रक्ताची कमी होते तेव्हा स्नायू आणि हाडं कमकुवत होऊ लागतात. 
 
या व्यतिरिक्त अशक्तपणाचे आणखी काही लक्षणे आहेत, ते जाणून आपण योग्यवेळी अशक्तपणाचे निराकरण करू शकता.

1 पायऱ्या चढताना किंवा जिम खान्यात नियमानं व्यायाम करताना धाप लागणं अशक्तपणाचे लक्षणं असू शकतात.
 
2 त्वचेचा रंग पिवळा होणं देखील अशक्तपणाचे चिन्ह असू शकतात. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. डॉ. च्या मते शरीरात रक्त परिसंचरण्याच्या कमतरतेमुळे किंवा लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे त्वचा पिवळसर होऊ शकते.
 
3 जर आपली संवेदनशीलता मध्ये वाढ झाली असल्यास आणि तग धरण्याच्या क्षमते मध्ये कमी होत असल्यास, हे देखील अशक्तपणाचे लक्षणं होऊ शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात लोह पातळी कमी होणं आहे आणि जेणे करून आपली रोग प्रतिकारक क्षमता प्रभावी होते.
 
4 जर आपल्याला पूर्वीपेक्षा आपली एकाग्रता कमी होण्याचे जाणवत असेल आणि एखाद्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करण्यात त्रास होत असेल तर ते देखील अशक्तपणाचे लक्षणं आहे.
 
5 शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे अशक्तपणाचा धोका होतो. व्हिटामिन डी च्या कमतरतेमुळे इन्म्यून इन्फ्लॉमेशनचा त्रास उद्भवू शकतो. या व्यतिरिक्त त्याचा कमतरतेमुळे हाडांना देखील इजा होऊ शकते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती