Eat rice daily डायटिंग करणारे तांदुळाचे पदार्थ खाणे टाळतात. पण काय आपल्या माहीत आहे की भात खाण्याचे किती फायदे आहेत? प्रत्येक पदार्थांप्रमाणे तांदूळ खाणेही आरोग्यासाठी फायदेशीर आहे पण लिमिटमध्ये. तसेच मधुमेह आणि दमा रोगींसाठी मात्र तांदूळ नुकसान करू शकतं, कारण याची प्रकृती गार असते. तर चला पाहू या भात खाण्याचे फायदे:
कर्करोगापासून बचाव: ब्राउन राईसचे सेवन कर्करोगापासून बचाव करतं.
त्वचा उजळते: आयुर्वेदाप्रमाणे त्वचा तेजस्वी हवी असल्यास तांदूळ खायला हवा. तसेच तांदुळाच्या पाण्याने ज्याला माढ म्हणतात, त्वचेची सर्व तक्रार दूर होते. यात आढळणारे एंटीऑक्सीडेंट सुरकुत्या कमी करतं.