आयुर्वेद हे केवळ वैद्यकीय शास्त्र नसून जीवन योग्य पद्धतीने जगण्याची पद्धत आहे. जे लोक आयुर्वेदाच्या नियमांचे पालन करून रोजच्या जीवनाचा आनंद घेतात ते दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगतात. आयुर्वेदात असे अनेक नियम आहेत जे उपचारादरम्यान तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. अशा नियमांपैकी एक आयुर्वेदिक कफ सिरपशी संबंधित आहे. याने तुम्ही कोणत्याही प्रकाराचा खोकला बरा करू शकता.
आयुर्वेदिक कफ सिरपचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात हर्बल अर्क वापरला जातो. त्यात अल्कोहोलचे प्रमाण नसतेे कारण बहुतेक कफ सिरपमध्ये अल्कोहोल कमी किंवा जास्त प्रमाणात वापरला जातं. या कारणामुळेच डॉक्टर अॅलोपॅथीची औषधे दुधासोबत घेण्याचा सल्ला देत नाहीत. तर आयुर्वेदात अशी अनेक औषधे आहेत, ज्याचे सेवन दुधासोबत केल्यास चांगले परिणाम मिळतात.
जर तुम्हाला कोरडा खोकला होत असेल तर अर्धा ग्लास कोमट दुधात एक चांगल्या गुणवत्तेचा आयुर्वेदिक कफ सिरप मिसळून त्याचे सेवन करा. परंतु जर तुम्हाला श्लेष्मासह खोकला येत असेल तर तुम्ही हे सिरप पाण्यासोबत घ्यावं. असे केल्याने खोकल्यामध्ये लवकर आराम मिळेल. छातीत जडपणा आणि श्वासासोबत घशातून येणारे विचित्र आवाज थांबतील.