वजन कमी करण्यासाठी आपल्याला आहार दुरुस्त करावा लागेल कारण कोणत्याही व्यायामाचा किंवा योगाचा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा आहारावर नियंत्रण असतो. वजन कमी करण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा अधिक समावेश करावा. शिवाय आहारातून पांढऱ्या गोष्टी काढून टाकव्या त्याऐवजी तपकिरी किंवा काळ्या रंगाचा समावेश करावा. जसे की पांढर्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस खा, साखरेऐवजी ब्राऊन शुगर किंवा गूळ खावा. शिवाय तुम्ही ब्लॅक बेरी आणि ब्लॅक गार्लिक यांचाही आहारात समावेश करू शकता. हे सर्व वजन कमी करण्यास मदत करतील.
ब्राऊन राईस किंवा ब्लॅक राईस- वजन कमी करताना ही तुम्ही भात खाऊ शकता, पण तुमच्या जेवणात ब्राऊन राईस किंवा ब्लॅक राईसचा समावेश करावा. काळ्या तांदळात भरपूर प्रमाणात एन्थोसायनिन्स असतं ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. हे एक अँटिऑक्सिडेंट आहे ज्याने जळजळ कमी होते. काळ्या तांदळात भरपूर फायबर आणि पोषक तत्व असतात. याचे सेवन केल्याने टाईप 2 मधुमेहाचा धोकाही कमी होतो. हे तांदूळ खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहतं .