पूजेशिवाय पण होतो कापूराचा उपयोग, जाणून घ्या 5 गोष्टी

शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (17:07 IST)
कापूर बहुतेक पूजेत वापरला जातो. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रातही त्याचे महत्त्व आणि उपयोग याबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की कापूर केवळ पूजेतच नाही तर आरोग्यासाठीही वापरला जातो.
 
 चला येथे जाणून घेऊया 5 उपयुक्त गोष्टी-
 
1. जर तुम्हाला घरामध्ये गुदमरल्यासारखे वाटत असेल तर थोडा कापूर लावून संपूर्ण घरामध्ये तो फिरवून द्यावा ज्याने ऑक्सिजनची पातळी वाढते.
 
2. केसांमध्ये कोंड्याची समस्या असल्यास खोबरेल तेलात कापूर मिसळून आठवड्यातून दोनदा मुळांवर लावा, लवकरच तुमची कोंड्याची समस्या दूर होईल.
 
3. सर्दी-खोकल्याचे लक्षणे दिसत असल्यास कापूर पाण्याची वाफ घेतल्याने आराम मिळतो.
 
4. घरामध्ये कापूर उघडा ठेवल्याने त्याच्या सुगंधाने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि घराचे वातावरणही शुद्ध होते.
 
5. जर तुमच्या पायात सतत सूज किंवा दुखत असेल तर तुम्हाला कापूरच्या उपयोग केल्याने आराम मिळतो. यासाठी गरम पाण्यात कापूर आणि मीठ घालून पाय शेकावे  लागतील.
 
अस्वीकरण: औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब जगतात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधीचा कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Edited by : Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती