कोरोना विषाणू 30 सेकंदातच मारता येऊ शकतो, फक्त हे करा

मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (15:57 IST)
जर आपल्याला असे वाटत आहे की आपण एखाद्या कोरोना संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलो आहोत तर सर्वप्रथम आपल्याला हे करायचे आहे की आपण तोंडातील लाळ गिळू नये ती थुंकून द्यावी आणि त्वरितच माऊथवॉश करावे.
 
अजाणता किंवा अनवधानाने कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात कोणी आले तर कोणालाही हे होऊ शकतं आणि लक्षण बघून कोरोना संसर्ग झाल्याचा संशय आल्यावर त्वरितच माऊथवॉश करून स्वतःला संरक्षित करता येऊ शकतं. हे अलीकडील संशोधनात आढळून आले आहे की बाजारपेठेत मिळणाऱ्या माऊथवॉशचे वेळीच वापर केल्याने कोरोनाच्या विषाणूचा नायनाट केवळ 30 सेकंदातच करू शकतो.
 
कोरोनाच्या रुग्णावर केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. एक निरोगी व्यक्ती एखाद्या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला आणि कोरोनाचे विषाणू त्यांच्या तोंडात गेल्यावर हा जीवघेणा व्हायरस माऊथवॉश केल्यानं त्वरितच नष्ट केला जाऊ शकतो. फक्त काळजी घ्या की आपल्याला तोंडाची लाळ गिळायची नाही तर थुंकायची आहे आणि माऊथवॉशचा वापर त्वरितच करायचा आहे. 
 
संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे मत आहे की माऊथवॉश ने कोरोनाच्या विषाणूंचा नायनाट तेव्हाच केला जाऊ शकतो, जो पर्यंत तोंडात लाळ आहे. जर त्या व्यक्तीने ती लाळ गिळली तर तो व्हायरस त्या व्यक्तीच्या श्वसनतंत्रात शिरकाव करतो आणि त्यावर माऊथवॉशचा काय परिणाम होतो हे सांगता येत नाही. पण हे स्पष्ट आहे की त्या परिस्थितीत माऊथवॉश फार प्रभावी होणार नाही. कारण हे तोंडातच असणार. 
 
संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की हाताला सेनेटाईझ करण्यासह जर वेळोवेळी माऊथवॉश केले तर कोरोनाच्या दुष्प्रभावाला कमी करता येऊ शकतं. 
 
लक्षात घ्या की कोरोनाच्या विषाणूंचे प्रभाव कमी करण्यासाठी आयुर्वेदिक तज्ज्ञ देखील वारंवार गरम पाणी पिण्याचा सल्ला देत आहे. दिवसातून एकदा तरी काढा आवर्जून प्यावा. 
 
माऊथवॉश मध्ये ही गुणवत्ता असावी -
शास्त्रज्ञ म्हणतात की कोरोनाचा तोंडातच नायनाट करण्यासाठी गरजेचे आहे की ज्या माऊथवॉशचे आपण वापर करत आहात त्यामध्ये किमान 0.07% सेटाइपिराइडनियम क्लोराइड (cetypyridinium chloride-CPC) असावे. 

अलीकडील झालेल्या आणखी एका संशोधनात आढळून आले आहे की CPC वर आधारित असलेले माऊथवॉश व्हायरसचेचे प्रमाण कमी करतं. 
 
तथापि, या अभ्यासांबद्दल अन्य शास्त्रज्ञांचे मत आणि त्यांच्या पुनरावलोकनाची अद्याप प्रतीक्षा आहे. परंतु हीच गोष्ट प्रयोगशाळेत देखील सिद्ध झाली आहे की तोंडाची स्वच्छता आणि हिरड्यांचे आरोग्यास लक्षात घेता जे माऊथवॉश वापरले जाते ते तोंडातील कोरोनाच्या विषाणूच्या निर्मूलनासाठी प्रभावी असू शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती