जास्त सेक्स करा, आजार पळवा!

पणजी- जास्तीत जास्त सेक्स केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते असा दावा एका अभ्यासाअंती करण्यात आला आहे. सेक्समुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही टळू शकतो, असेही या संशोधकांचे म्हणणे आहे.
हार्वर्ड टी. एच. चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ च्या संशोधकांनी हा शोध लावला आहे. महिन्यातून किमान 21 वेळा वीर्यस्खलन करणार्‍या 20 वर्षीय तरूणाचा प्रोस्टेट कॅन्सरचा धोका 19 टक्क्यांनी कमी होतो तर 40 वर्षीय व्यक्तीच्या बाबतीत हेच प्रमाण 22 टक्के इतके आढळले, असे संशोधकांचे म्हणरे आहे.
 
सेक्स करताना आणि नंतर बराच वेळ तुमचा मेंदू नोरपाइनफ्रिन, सेरोटॉनिन, ऑक्सिटॉसिन आणि वॅसोप्रेसिनचे उत्सर्जन करत असतो. त्यामुळे आपल्याला परमोच्च आनंदाची अनुभूती होते. विशेषत: या सर्वाचा परिणाम म्हणून निवांत झोप लागण्यासही मदत होते. सेक्स केल्याने तणावही आपसूक दूर होतो, असा निष्कर्षही या संशोधनातून काढण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती