न्यूमोनियाची लस कोरोना विषाणूंपासून संरक्षण देऊ शकते?जाणून घ्या

मंगळवार, 25 मे 2021 (23:04 IST)
आजकाल कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सरकार लसीवर अधिक भर देत आहे. कारण सध्या कोरोना रोखण्याचे एकमेव उपचार म्हणजे लसीकरण. लस नंतरही कोविडच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
कारण कोविड हे दोन्ही डोस नंतरही होऊ शकत.पण आरामाची गोष्ट म्हणजे आपल्याला रुग्णालयात जाण्याची गरज नाही. मात्र, देशात लसीची बरीच कमतरता आहे, यामुळे अनेक केंद्रेही बंद पडली आहेत. परंतु न्यूमोनियाची लस कोरोना विषाणूंपासून संरक्षण देते असे म्हणत काही दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर पसरविली जात आहे.यात किती सत्य आहे? व्हायरल माहितीची पुष्टी करण्यासाठी, वेबदुनियाने आरोग्य तज्ञाशी चर्चा केली, काय म्हणाले ते जाणून घेऊया
होमिओपॅथीचे डॉक्टर डॉ. एके द्विवेदी यांनी वेबदुनियाला सांगितले की, "आरोग्य मंत्रालयापर्यंत किंवा
जागतिक आरोग्य संस्था(डब्ल्यूएचओ) नाही म्हणत तोपर्यंत अशा लस दिल्या जाऊ नयेत. एखादी मोठी संस्था डब्ल्यूएचओ, आयसीएमआर प्रमाणित करेल तरच हे उपयोगास घ्यावे. फक्त सोशल मीडियावर गोष्टी व्हायरल झाल्यामुळे त्याचा वापर करू नका. '
 
ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ भारत रावत यांनी सांगितले की, 'हा न्यूमोनियाचाच एक प्रकारआहे.परंतु दरवर्षी वेगवेगळ्या फ्लूची लस येते. त्याच्यासाठी वेगवेगळ्या लस तयार केल्या जातात. म्हणूनच आपण ते लावले तरी ते कमी प्रभावी होईल.इतर विषाणूच्या लशीचा विषाणूवर फारसा परिणाम होणार नाही. '
 
दिशाभूल करणार्‍या माहितीवर सरकारने आळा घातला
 
सोशल मीडियावर निमोनियाच्या लशीची माहिती घाईने व्हायरल होत होती. याची दखल घेत सरकारने ट्विटरवर लिहिले आणि त्यात लिहिले की निमोनियाची लस एका विशिष्ट जीवांसाठी आहे जे अनेक संसर्ग निर्माण करतात.  या मुळे कोविड -19 चे संसर्ग रोखले जाऊ शकत नाही. सरकारने ही अफवा थांबविली आणि असे म्हटले की अशा अफवांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. जागरूक रहा,सतर्क राहा  आणि सुरक्षित रहा.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती