वैद्यकीय क्षेत्रात लाल प्लस चा चिन्ह का वापरतात,जाणून घ्या

रविवार, 27 जून 2021 (08:00 IST)
आपण बघितले असणार की जे लोक वैद्यकीय क्षेत्रात असतात त्यांच्या वाहनांवर लाल प्लस चे चिन्ह अंकित केलेले असतात.आपण विचार केला आहे की असं का होत?

वास्तविक ज्या लाल प्लसच्या चिन्हाचा वापर वैद्यकीय क्षेत्रात केला जातो ते रेड क्रॉसचे संकेत चिन्ह आहे,जे वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात एक स्वयंसेवी संस्था आहे.रेड क्रॉसची मूळ अंतर्राष्ट्रीय समिती 1963 मध्ये जिनेव्हा,स्वित्झर्लंड मध्ये हेनरी, डुनेंट आणि गुस्ताव्ह मोनिअर यांनी स्थापन केली आहे. हे चिन्ह नेहमी रुग्णालयात,नर्सिंग होम,क्लिनिक,डिस्पेन्सरी,ऍम्ब्युलन्स इत्यादी ठिकाणी आढळते.
 
डॉक्टर किंवा वैद्यकीय चिकित्सा क्षेत्राशी निगडित व्यक्ती या चिन्हाचा वापर यासाठी करतात की आपत्कालीन स्थितीत त्यांना सहजपणे ओळखता येऊ शकेल.
 
याच कारणास्तव वैद्यकीय चिकित्साच्या क्षेत्रात लाल प्लसचा चिन्ह वापरतात. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती