वेगानं धावणारा चपळ प्राणी 'चित्ता'

मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (12:10 IST)
* पृथ्वीवर चित्ता सर्वात वेगानं धावणारा प्राणी आहे जो तासी सुमारे 113 किमी प्रति वेगानं धावू शकतो.
 
* चित्ता काही क्षणात 0 ते 113 किलोमीटर तासी धावू शकतो.
 
* चित्ता जरी वेगाने धावतो तेवढ्याच लवकर थकून देखील जातो आणि पुन्हा धावण्या पूर्वी त्याला विश्रांतीची गरज असते.
 
* चित्ताचे वजन 45 ते 60 किलोग्रॅम असतं आणि हा मांजरीच्या कुटुंबात सर्वात लहान प्राणी आहे.
 
* चित्त्याची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असते आणि हा प्राणी आपल्या शिकारला दिवसात सुमारे 5 किमी दूर असून देखील बघू शकतो.
 
* मांजरीच्या कुटुंबातील चित्ताच एक असा प्राणी आहे जो गर्जना करू शकत नाही. तथापि, हे जेव्हा आपल्या कळपासह असल्यावर मोठ्या आवाजात चित्ता घुरघुरतो.
 
* सिंह आणि बिबट्याच्या उलट चित्ता फक्त दिवसातच शिकार करू शकतात.
 
* चित्ताचे पंजे टोकदार नसतात आणि त्यांचा शरीराचे वजन देखील हलके असते ज्या मुळे ते आपल्या शत्रूंसमोर देखील कमकुवत होऊ शकतात. चित्ता आपल्या शारीरिक अशक्तपणामुळे किंवा एखाद्या मोठ्या प्राण्याशी लढताना किंवा शिकार करताना पटकन हरतो.
 
* चित्ताची दृष्टी रात्रीच्या वेळी कमकुवत असते. ज्यामुळे हा प्राणी शिकार करू शकत नाही. त्याचे पंजे तीक्ष्ण नसतात, ज्यामुळे त्याला झाडावर चढता येत नाही आणि शिकार करताना त्याला नुकसान देखील होतो. तो शिकार वर उडी मारून त्याचा पाठलाग करतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती