'तीक्ष्ण ऐकण्याची क्षमता असणारा मासा शार्क'

शनिवार, 7 नोव्हेंबर 2020 (14:26 IST)
* शार्क मासामध्ये वास घेण्याची क्षमता अधिक असते आणि पाण्यात एका रक्ताच्या थेंबाचा वास देखील ती घेऊ शकते आणि समजू शकते.
 
* शार्कचा सांगाडा कार्टिलेजने बनलेला असतो जो खूप मजबूत असतो. शार्कचे ऊतक लवचिक असतात. यांच्या शरीरात एक ही हाड नसतं.
 
* शार्कची ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण असते. या मुळे तिला 500 मीटर अंतरावर मास्यांची आवाज ऐकायला येऊ शकते.
 
* शार्कचे मागचे दात लहान असतात. लहान दात पुढे आलेले असतात आणि त्यांचे पुढचे दात पडतात.
 
* शार्क मास्याला आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिळविण्यासाठी फिरावे लागते कारण पाणी त्यांच्या गिल्स वरून ओसरतं.
 
* पांढऱ्या रंगाची शार्क 30 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने पाण्यात पोहू शकते आणि हा मासा धोकादायक असतो.
 
* पूर्णपणे विकसित झाल्यावर व्हेल शार्कची लांबी 14 मीटर पर्यंत असते.
 
* काही शार्क मुलांना जन्म देण्याऐवजी अंडी देतात.
 
* बेबी शार्कला जन्मापासूनच स्वतःचे रक्षण करावे लागते कारण जन्मा नंतर त्यांची आई त्यांना खाऊ शकते. 
 
* पांढऱ्या शार्कला आपल्या शरीराचे तापमान राखण्यासाठी भरपूर मांस खावं लागतं. 
 
* प्रत्येक शार्कच्या प्रजातीचे दात वेगवेगळे असतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती