एक समजूतदार मासा 'डॉल्फिन मासा'

मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (10:30 IST)
* डॉल्फिन माशाची दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता खूप चांगली असते. ज्यामुळे त्या इकोलोकेशन चा वापर करून गोष्टींच्या जागेची माहिती अधिक चांगल्या प्रकारे शोधण्यात सक्षम असते. 
 
* डॉल्फिन्स एकमेकांना संपर्क करण्यासाठी व्हिसलिंग, क्लिकिंग आणि इतर आवाजांचा वापर करतात. 
 
* किलर व्हेल किंवा ओर्का एक प्रकारची डॉल्फिनचं आहे. 
 
* नर डॉल्फिनला बुल म्हणजे बैल म्हणतात आणि मादी डॉल्फिनला काऊ किंवा गाय म्हणतात आणि डॉल्फिनच्या मुलांना वासरू म्हणतात.
 
* सामान्यतः दिसणारी डॉल्फिन बोतलनोस डॉल्फिन असते.
 
* डॉल्फिनच्या डोक्यात एक ब्लोहोल असतो ज्या मुळे ते श्वास घेतात.
 
* डॉल्फिनच्या कळपाला पॉड किंवा स्कूल म्हणतात ज्या मध्ये डझनभर किंवा 12 डॉल्फिन असतात.
 
* डॉल्फिन सर्वात जास्त शहाणा प्राणी मानला जातो. आणि हा मासा माणसांशी देखील संवाद साधतो. हा मासा पाण्यात उंच उडी मारू शकतो, आरामात पोहतो आणि पाण्यात खेळतो.
 
* जाळ्याचा वापर केल्याने दर वर्षी अनेक डॉल्फिन मरण पावतात आणि आता तर त्यांचा अनेक प्रजात्या देखील संपुष्टात आल्या आहेत.
 
* डॉल्फिन या कोर्निव्होर्स असतात म्हणजे फक्त मांसाहार खाणारे.
 
* डॉल्फिन मासा सर्वात जास्त सामाजिक आहे आणि हा मासा इतर डॉल्फिन मास्यांची मित्र द्रुतपणे बनतात. खरं तर असे ही म्हटले जाते की डॉल्फिन मासा आपले बरेच सोशल नेटवर्क देखील बनवतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती