ओळखा बघू कोण ?

बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (12:05 IST)
1 आजीबाईच्या शेतात, एका सुपलीत, ठेवले बारा कणसं, त्या कणसात तीस -एकतीस दाणे अर्धे काळे नी अर्धे पांढरे, हेच असे आपले जीवनाचे गाणे.
 
2 हिरवी पेटी काट्यात पडली,
उघडून बघितल्यावर मोत्याने भरली.
 
3 तीन जण वाढी बारा जण जेवी.
 
4 पाऊस नाही,
पाणी नाही 
रान कसं हिरवं.
कात नाही 
चुना नाही,
तोंड कसं रंगलं.
 
5 मुकुट याचा डोक्यावर, 
जांभळा झगा ह्याचा अंगावर. 
 
6 काळा माझा रंग आहे, 
नेहमीच मी ओरडतो, 
नावडणारा पक्षी मी 
तरी ही गच्ची वर येतो.
 
7 दिसायला फारच सुंदर 
फुलातून जेवण घेते,
सगळी कडे उडत जाते 
सगळ्यांनाच आवडते. 
 
8 उन्हाळ्यात सर्वांची लाडकी, 
हिवाळ्यात होते नावडती,
 
कोणालाच ती दिसेनासी होते 
हाती कोणाच्या ही येत नाही.
 
9 दररोज रात्री येते,
सुंदर स्वप्न दाखवते
सगळ्यांना आराम मी घडवते.
सांगा माझे नाव.
 
10 मी कोणतेही पक्षी नसे
दर रोज तुम्हाला जागवत असे 
वेळ देखील तुम्हाला दाखवत असे,
सांगा मला काय म्हणत असे. 
 
 
उत्तरे: वर्ष, महिने, दिवस, रात्र, भेंडी, घडल्याळ, पोपट, वांगं, कावळा, फुल पाखरू, वारा, झोप, अलार्म घड्याळ.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती