विवाह पंचमी 2021 जाणून घ्या श्री राम विवाहोत्सव महत्व, शुभ मुहूर्त आणि सोपी पूजा पद्धत आणि कथा

मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (11:33 IST)
विवाह पंचमी हा शुभ दिवस आहे जेव्हा श्री राम आणि सीता यांचा शुभ विवाह झाला होता. विवाह पंचमीच्या दिवशी, श्री राम आणि माता सीता नात्यात बांधले गेले होते, म्हणून हा दिवस भगवान श्री राम आणि माता साजरा करतात. हा सीतेचा विवाहसोहळा म्हणून साजरा केला जातो.
 
विवाह पंचमीच्या दिवशी सीता-रामाच्या मंदिरांमध्ये भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी भक्त विशेष पूजा आणि विधी करतात. भारत आणि नेपाळमधील लोक हा दिवस अत्यंत शुभ मानतात. भारतात विशेषत: अयोध्येत भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तुलसीदासांनीही विवाह पंचमीच्या दिवशी रामचरितमानसाची रचना पूर्ण केली होती.
 
विवाह पंचमी महत्व Importance of Vivah Panchami
 
विवाहपंचमीच्या दिवशी श्री राम, माता सीता यांच्या विधीवत पूजनाने विवाहातील सर्व अडथळे दूर होतात. अविवाहित मुलींनी एकंदरीत सीता-रामाची पूजा केली तर ते इच्छित जीवनसाथी मिळेल. या दिवशी विधी केल्याने विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखी होते.
 
विवाह पंचमी शुभ मुहूर्त Vivah Panchammi Muhurat
 
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तिथी आरंभ : 07 डिसेंबर 2021 रोजी रात्री 11 वाजून 40 मिनिटापासून
 
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तिथी समाप्त : 08 डिसेंबर 2021 रोजी रात्री 09 वाजून 25 मिनिटापर्यंत
 
विवाह पंचमीच्या दिवशी काय करावे Vivah Panchammi Puja vidhi
 
पंचमीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून मनापासून श्रीरामाचे ध्यान करावे.
 
एक चौरंगावर गंगाजल शिंपडून त्याला शुद्ध करुन आसन घालावे.
 
आता चौरंगावर भगवान राम, माता सीता यांची प्रतिमा किंवा तसबीर स्थापित करावी
 
रामाला पिवळे तर सीतेला लाल वस्त्र नेसवावे.
 
दीप प्रज्वलन करून दोघांना तिलक करावे. फळ-फुलं नैवेद्य अर्पित करुन विधीपूर्वक पूजन करावे.
 
पूजा करताना बालकांड यात दिलेल्या विवाह प्रसंगाचा पाठ करावा.
 
या दिवशी रामचरितमानस पाठ केल्याने जीवनात आणि घरात सुख-शांती राहते.
 
विवाह पंचमीच्या दिवशी राम- सीता विवाह सोहळा आयोजित करावा.
 
ॐ जानकीवल्लभाय नमः जप करावं. नंतर भगवान राम आणि सीता देवी याचं गठबंधन करावं. नंतर आरती करावी. गठबंधनासाठी जमवलेल्या वस्तू जवळ ठेवाव्या.
 
राम- सीता यांची सोबत पूजा करावी. या दिवशी रामचरितमानस पाठ करावा. बालकांड मध्ये भगवान राम- सीता विवाह पाठ करावा.
 
या दिवशी पूजा केल्याने विवाहात येत असलेल्या अडचणी दूर होतात आणि लवकर लग्न होण्याचे योग जुळुन येतात.
 
देशभरात विवाह पंचमीला लोग पूजा-पाठ करतात आणि राम- सीता याचं विवाह लावतात. सकाळी स्नान केल्यानंतरच राम विवाहाचं संकल्प घ्यावं. नंतर लग्नाची तयारी सुरु करावी.
 
ज्याचं वैवाहिक जीवन सुखी नाही, आपसात वाद होतात त्यांनी नक्की ही पूजा करावी. याने दांपत्य जीवन सुखी होईल.
 
विवाह पंचमी कथा
 
विवाहपंचमीच्या दिवशी कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते. चला वाचूया कथा...
 
कथा- राजा दशरथाच्या घरी रामाचा जन्म झाला आणि सीता ही राजा जनकाची कन्या. सीतेचा जन्म पृथ्वीपासून झाला असे मानले जाते. राजा जनक नांगर चालवत असताना त्याला एक लहान मुलगी दिसली. 
 
त्यांनी तिचे नाव सीता ठेवले. सीताजींना जनकनंदिनी या नावानेही संबोधले जाते.

एकदा सीतेने शिवाचे धनुष्य उचलले होते, जे परशुरामांशिवाय कोणीही उचलू शकत नव्हते. राजा जनकाने ठरवले की जो कोणी शिवाचे धनुष्य उचलू शकेल तो सीतेशी विवाह करेल.
 
सीतेच्या स्वयंवराच्या घोषणा झाल्या. भगवान राम आणि लक्ष्मण देखील स्वयंवरात सहभागी झाले होते. इतर अनेक राजपुत्र होते पण शिवधनुष्य कोणी उचलू शकले नाही.
 
राजा जनक हताश झाले आणि म्हणाले, 'माझ्या मुलीच्या लायक कोणी नाही का?' तेव्हा महर्षी वशिष्ठांनी भगवान रामाला शिवाच्या धनुष्याची प्रत्यंचा चढविण्यास सांगितले. गुरुच्या आदेशाचे पालन करत असताना भगवान रामाने शिवाच्या धनुष्य तुटले.
 
अशा प्रकारे सीताजींचा रामाशी विवाह झाला. भारतीय समाजात राम आणि सीता यांना आदर्श जोडप्याचे उदाहरण मानले जाते. राम सीतेचे जीवन प्रेम, आदर्श, समर्पण आणि मूल्यांनी परिपूर्ण होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती