पौराणिक मान्यतेनुसार कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे. या दिवशी माँ दुर्गेची पूजा करण्याचाही नियम आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते. शिवशंकराचे रुद्र रूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते. कालभैरवाला काशीचा कोतवाल असेही म्हणतात.
कालाष्टमी कशी साजरी करावी?
कालाष्टमी हा भगवान शिवाच्या भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस आहे, सूर्योदयापूर्वी उठून लवकर स्नान करा.
कालाष्टमीला भगवान भैरवांना प्रसन्न करण्याचे उपाय :
कालाष्टमीच्या दिवशी भैरवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि श्रीकालभैरवष्टकम् पाठ करा.
मनोकामना पूर्ण होईपर्यंत हा उपाय रोज भक्तिभावाने करा.
कालाष्टमीच्या दिवशी चंदनाने 'ओम नमः शिवाय' लिहून शिवलिंगाला 21 बिल्वची पाने अर्पण करा.
ब्राह्मणांना अन्न, वस्त्र आणि पैसा दान करा.
कालाष्टमीच्या दिवसापासून 40 दिवस सतत कालभैरवाचे दर्शन घ्या. हा उपाय केल्याने भगवान भैरव प्रसन्न होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.