Kalashtami Vrat: कालाष्टमी महत्व आणि पूजा विधि

बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (08:57 IST)
हिंदू धर्मानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरा केली जाते. या दिवशी विशेष रुपाने भोलेबाबाच्या रौद्र रुप काल भैरवाची पूजा केली जाते. आपल्या जवळपासच्या नकारात्मक ऊर्जेला दूर करण्यासाठी या दिवशी व्रत केलं जातं.
 
धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शिव भगवानने पापीं लोकांचे विनाश करण्यासाठी आपले रौद्र रुप धारण केले होते. पौराणिक मान्यतेनुसार शिवाचे दोन रुप सांगितले गेले आहे, बटुक भैरव आणि काल भैरव.
 
बटुक भैरव आपल्या भक्तांना आपलं सौम्य रुप प्रदान करतात जेव्हाकी काल भैरव गुन्हा प्रवृत्ती नियंत्रण करण्यासाठी मानले गेले आहे.
 
मासिक कालाषटमीची पूजा रात्री केली जाते. या दिवशी काल भैरवाची पूजा 16 प्रकाराचे केली जाते. रात्री चंद्राला अर्घ्य देण्याचे व्रत पूर्ण मानलं जातं. या दिवशी व्रत करणारे भोलेबाबासह देवी पार्वतीची पूजा करुन कथा करतात, भजन कीर्तन करतात. या दिवशी भैरव बाबाची कथा नक्की करावी.
 
नंतर काळ्या कुत्र्याला भोजन द्यावे. असे केल्याने नकरात्मकता दूर होते, आर्थिक अडचणी देखील दूर होतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती