3 कारणांमुळे हनुमान भक्त शनिच्या वाईट दृष्टीपासून वाचतात

शनिवार, 30 जानेवारी 2021 (10:12 IST)
शनी किंवा इतर ग्रहाची बाधा असल्यास, साडे साती किंवा ढय्या असल्यास किंवा राहूची महादशा चालत असेल तरी घाबरण्याची गरज नाही. कारण ज्यांच्यावर हनुमानाची कृपा असते त्याचं शनी आणि यमराज काहीही वाईट करु शकत नाही. आपण दर मंगळवारी हनुमान मंदिरात जात असाल, मास-मदिरापासून दूर राहत असाल तर हनुमानाची कृपा आपल्यावर राहील. या व्यतिरिक्त शनिवारी सुंदरकांड किंवा हनुमान चालीसा पाठ केल्याने शनी आपल्या लाभ देतील. शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाला कणकेचा दिवा लावावा. आता जाणून घ्या की का शनिदेव हनुमान भक्तांना वाईट दृष्टीने बघत नाही-
 
1. एकदा रामजप यात अडथळे घालत असल्यामुळे हनुमानाने शनिदेवांना आपल्या शेपटीत गुंडाळून घेतले होते आणि आपलं रामकार्य करत होते. या दरम्यान शनिदेव अनेकदा जखमी झाले. नंतर हनुमानाला आठवल्यावर त्यांनी शनिदेवांना मुक्त केले. तेव्हा शनिदेवांना आपली चूक कळली आणि म्हटले की यानंतर कधीही रामकार्य करत असलेले आणि आपल्या भक्तांच्या कार्यांत मी बाधक नसणार.
 
2. एकदा हनुनामाने शनिदेवांना रावणाच्या कैदेतून मुक्त केले होते तेव्हा शनिदेवांनी वचन दिले होते की मी आपल्या भक्तांवर कृपा करेन.
 
3. पराशर संहिता यात हनुमानाच्या लग्नाचा उल्लेख आहे. हनुमानाचा सांकेतिक विवाह सूर्य पुत्री सुवर्चला हिच्याशी झाल्याचे मानले जाते. आंध्रप्रदेशाच्या खम्मममध्ये एक प्राचीन हनुमान मंदिर आहे जिथे हनुमानासोबत त्यांच्या पत्नीची मूर्ती देखील विराजमान आहे. शास्त्रांमध्ये शनी महाराजांना सूर्य पुत्र सांगितले आहे. या नात्याने हनुमानाची पत्नी सुवर्चला शनि महाराजांची बहिण आाहे. आणि सर्व संकट दूर करणारे हनुमान भाग्य देवता शनिदेवांचे मेहुणे झाले. चंद्राला हनुमानाने शनिपासून वाचवले होते म्हणून ते चंद्रशेखर म्हणून ओळखले गेले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती