प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी भगवान शंकराच्या रुद्ररुप भगवान कालभैरवाची पूजा केली जाते. भगवान भैरव, भगवान शिव यांचे अवतार आहे. कालाष्टमीला भैरवाष्टमी नावाने देखील ओळखलं जातं. या पवित्र दिवशी भगवान भैरवाची पूजा केल्याने मृत्युची भीती नाहीशी होते आणि पापांचा नाश होतो. भगवान भैरव सर्व प्रकाराच्या आजरांपासून मुक्ती देतात. या दिवशी व्रत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
पूजा स्थळी गंगेचे पाणी शिंपडावं आणि स्थान शुद्ध करावं.
नंतर कालभैरवाची मूर्ती शुभ ठिकाणी स्थापित करावी.
फुले, नारळ, इमरती, पान इत्यादी अर्पण करावं.
भगवान कालभैरवासमोर धूप-दीव लावावी.
भैरव मंत्रांचा 108 वेळा जप करावा.