वसंत पंचमी: शुभ मुहूर्तावर यश प्राप्तीसाठी सोपे उपाय

गुरूवार, 30 जानेवारी 2020 (11:06 IST)
वसंत पंचमीला विद्या आणि बुद्धीची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. पुराणात वर्णित एका कथेप्रमाणे प्रभू श्रीकृष्णाने देवी सरस्वतीवर खूश होऊन देवीची वसंत पंचमीच्या दिवशी आपली आराधना केली जाईल असा वरदान दिला होता.
 
बुद्धीचा वरदान
या दिवशी सरस्वती पूजनाचे महत्त्व आहे.
या दिवशी देवी सरस्वती समक्ष नील सरस्वती स्त्रोताचे पाठ करावे.
या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने ज्ञानाचे वरदान मिळते.
 
यामुळे खास आहे वसंत पंचमी
वर्षातील काही विशेष शुभ मुर्हूतांपैकी एक मुर्हूत वसंत पंचमी असा आहे.
यात विवाह, निर्माण कार्य, आणि इतर शुभ कार्य केले जातात.
या संधीकाळात ज्ञान आणि विज्ञान दोन्हींचे वरदान मिळतं.
संगीत कला आणि आध्यात्माचा आशीर्वाद देखील या काळात मिळतो.
कुंडलीत विद्या, बुद्धीचे योग नसल्यास किंवा अभ्यासात अडचणी येत असल्यास या दिवशी विशेष पूजा करुन यश मिळू शकतं.
 
वसंत पंचमी उपाय
कुंडलती बुध कमजोर असल्यास बुद्धी कमजोर होते. अशात देवी सरस्वतीची पूजा करावी. देवीला हिरव्या रंगाचे फळ अर्पित करावे.
 
बृहस्पती कमजोर असेल तरी विद्या प्राप्तीत अडथळे निर्माण होतात. अशात वसंत पंचमीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे. पिवळे फुल आणि पिवळे फळांनी देवीची उपासना करावी.
 
कुंडलीत शुक्र कमजोर असल्यास मन चंचल असतं आणि करिअरची निवड करण्यात अडथळे येतात. अशात वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची आराधना करावी. पांढर्‍या फुलांनी देवीची उपासना केल्याने फायदा होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती