वसंत पंचमीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर एखाद्या शांत जागेवर किंवा मंदिरात पूर्व दिशेकडे मुख करून बसावे. आपल्यासमोर लाकडाचे चौरंग ठेवावे. त्यावर पांढरा कपडा घालावा आणि त्यावर देवी सरस्वतीचा फोटो किंवा प्रतिमा स्थापित करावी. चौरंगावरच एका तांब्याच्या ताम्हणात किंवा ताटलीत अक्षता ठेवून प्राण-प्रतिष्ठित व चेतनायुक्त शुभ मुहूर्तात सिद्ध केलेलं 'सरस्वती यंत्र' स्थापित करावं.
वह्निशुद्धां शुकाधानां वीणापुस्तकमधारिणीम्।।
पूजेनंतर देवी सरस्वतीकडे आपल्या व आपल्या मुलांसाठी ऋद्धी-सिद्धी, विद्यार्जन, तीव्र स्मरण शक्ती प्रदान करण्याची प्रार्थना करावी.