वसंत पंचमी: भारतातवेगवेगळ्या प्रकारे साजरा होणार सण
मंगळवार, 28 जानेवारी 2020 (15:34 IST)
वसंत पंचमी शिशिर ऋतूमध्ये येते. याला माघ शुद्ध पंचमी पण म्हणतात. मकर संक्रांतीनंतर जेव्हा सूर्य उत्तरायण होतात त्या काळात हा सण साजरा केला जातो. या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवसापासूनच वसंत ऋतूचे आगमन होते. हा सण भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केला जातो. या दिनाला देवी सरस्वतीचे जन्मदिवस म्हणून ओळखले जाते.
मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात विशेष उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गणपती, इंद्र, शिव आणि सूर्य देवाची पूजा करतात. हा दिन कृषी संस्कृतीशी निगडित असतो. शेतकरी या दिवशी नवान्न इष्टी याग करतात. बंगाल मध्ये या दिवशी भक्तिगीत म्हणतात. वसंत पंचमीला ज्ञान पंचमी पण म्हणत असे. प्रेम भावनेचे प्रतीक म्हणून हा सण साजरा करण्याची पद्धत आहे.
वसंत पंचमी आणि भारताचे वेगवेगळे प्रांत :
वसंत पंचमी भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर पण साजरी होते. मग बघू या भारतात कुठे आणि कसा हा सण साजरा होतो ते.
बिहार मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील देव गावात सूर्यमंदिरात सूर्याला स्नान घालून नवी लाल वस्त्र परिधान करतात. नृत्य, गीत, संगीताचे सादरीकरण केले जाते. लोक गुलाबी, पिवळे रंगाच्या वस्त्राचे परिधान करतात.
पश्चिम बंगालात देवी सरस्वतीची पूजा करून पिवळी वस्त्रे घालतात. देवीच्या पायथ्याशी पुस्तके ठेवून देवीचा आशीर्वाद घेतला जातो. मुले प्रथम वेळीस लिहिताना पाटीवर मुळाक्षरे काढतात आणि आपल्या शिक्षणाची सुरुवात करतात.
कोलकाता मध्ये देखील या पिवळी वस्त्रे घालण्याची परंपरा आहे.
राजस्थानमधील लोकं मोगऱ्याच्या फुलांच्या माळी गळ्यात घालून नवे पिवळे वस्त्र धारण करतात. पिवळ्या रंगाच्या फुलांनी आपल्या घराची सजावट करतात. गोडाचे जेवण करतात.
पतंग उत्सव म्हणून विभाजनानंतर पाकिस्तानात असलेल्या पंजाबात हा सण पतंग उत्सव म्हणून साजरा केला जातो. केशरी भात जेवण्यात समाविष्ट केला जातो. शेतातील मोहरीच्या मोहरते त्यावेळी हा सण साजरा केला जातो.
शीख संप्रदाय पिवळी वस्त्रे धारण करून गुरुद्वारात सण साजरा करण्याची पद्धत आहे. पतंग उत्सव म्हणून हा दिवस साजरा होतो.
बालीमध्ये हा दिवस हरीराया सरस्वती नावाने साजरा होतो. विद्यार्थी आणि शिक्षक गडद पोशाख परिधान करतात. देऊळात पक्वान्नाचा प्रसाद असतो. देवी सरस्वतीची प्रार्थना स्तुती करतात.