॥ श्री जोगेश्वरीची आरती ॥
जय देवी जय देवी जय जोगेश्वरी जननी |
आरती ओवाळितो तुझीया पावन चरणी ॥ धृ ॥
तूच निर्मिलेस विश्व सारे |
आकाश, प्रकाश, कोटी कोटी तारे |
तुझ्या हाती जन्म मरणाचे फेरे |
आदि जननी तूच, जीवन संजीवनी |
करुणा कर, शरण शरण तव चरणी ॥ २ ॥
सहस्त्र सूर्यांचे तेज तव शरीरात |
शीतलता शत चंद्रांची नयनात |
ग्रह नक्षत्रांच्या माळा तव कंठात |
सर्व तीर्थांचे मांगल्य तुझीया चरणी ॥ ३ ॥
कर आई विघ्नांचे निरसन |
दूर्धर रोगांचे निर्मूलन |
दुःख दारिद्रयाचे दहन |
फळा फुलांनी, धन धान्यांनी बहरु दे धरणी ॥ ४ ॥