Hanuman Janmotsav 2026 Wishes in Marathi हनुमान जन्मोत्सव शुभेच्छा

बुधवार, 1 एप्रिल 2026 (13:20 IST)
बलोपासनेचा संदेश देणाऱ्या, 
संकटमोचक महाबली हनुमान जन्मोत्सवाच्या 
तुम्हास व तुमच्या कुटुंबास हार्दिक शुभेच्छा!
 
ज्यांच्या मनात श्रीराम वसतात, 
ज्यांच्या अंगी अफाट शक्ती आहे, 
अशा पवनपुत्र मारुतीच्या चरणी साष्टांग दंडवत. 
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
 
अंजनीचा सुत तू, रामाचा दूत तू... 
संकटांना हरणारा, तूच आमुचा कैवारी! 
हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.
 
हाती गदा, मुखी राम नाम, 
शक्तीची भक्ती आणि भक्तीचे धाम... 
हनुमान जन्मोत्सवा निमित्त मंगलमयी शुभेच्छा!
 
शक्ती, बुद्धी आणि विद्येचे प्रतीक असलेल्या 
बजरंगबलीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होवोत. 
शुभ हनुमान जयंती!
 
रामदूताचा महिमा अगाध, त्याने जिंकले साऱ्यांचे मन... 
अशा या महाबलीला करूया मनोभावे वंदन. 
हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!
 
बुद्धिहिन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, 
बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. 
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
रामाचा तो परम भक्त, दुष्टांचा तो काळ... 
भक्तांच्या हाकेला धावून येणारा, तोच आमचा मारुती बाळ. 
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
 
ज्यांच्या हृदयात सीता-राम, ज्यांच्या मुखात राम नाम... 
अशा रामभक्त हनुमानाचा जन्मदिवस उत्साहात साजरा करूया!
 
संकटमोचन हनुमानाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो, 
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 
हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!
 
मूर्ती लहान पण कीर्ती महान, 
साऱ्या जगाचे रक्षण करी आमचा हनुमान. 
हनुमान जयंती निमित्त आपणास मनःपूर्वक शुभेच्छा!
 
भक्ती आणि शक्तीचा अद्भुत संगम म्हणजे 'हनुमान'
या पावन दिनी बजरंगबलीच्या चरणी नतमस्तक होऊया
शुभ हनुमान जयंती!
 
पवनपुत्र हनुमान तुम्हाला सुख, शांती आणि उत्तम आरोग्य देवो, हीच सदिच्छा
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती... 
तुमच्या आयुष्यात सदैव यशाची प्रचिती येवो
हनुमान जयंतीच्या खूप शुभेच्छा!
 
जय जय बजरंगबली! 
हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने 
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच सदिच्छा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती