RBI ने असिस्टेंट मॅनेजरसह या पदांसाठी निघाल्या आहेत भरती, 10 एप्रिलपर्यंत करता येईल अर्ज

मंगळवार, 9 मार्च 2021 (10:31 IST)
रिझर्व बँक ऑफ इंडियाने लीगल ऑफिसर (ग्रेड B), मॅनेजर (Tech,civil), असिस्टेंट मॅनेजर (राजभाषा) आणि असिस्टेंट मॅनेजर (प्रोटोकॉल आणि सिक्योरिटी) पदांसाठी भरती काढली आहे. आरबीआयच्या ऑफिशियल वेबसाइट rbi.org.in वर जाऊन इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात.
 
आरबीआयच्या 29 पदांसाठी अर्ज मा‍गविण्यात आले आहे. यापैकी 12 पोस्ट ग्रेड 'ए' मध्ये सहाय्यक प्रबंधक (राजभाषा) साठी, 11 ग्रेड 'बी' मध्ये लीगल अधिकारी पदासाठी, 5 सहाय्यक प्रबंधक (प्रोटोकॉल आणि सुरक्षा) साठी आणि एक प्रबंधक (टेक-सिव्हिल) साठी आहे.
 
या पदांवर अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल आहे. या पदांवर उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा माध्यम द्वारे करण्यात येईल. ऑनलाइन परीक्षा मेरिट लिस्टच्या आधारावर उत्तीर्ण करणार्‍या उमेदवारांना साक्षात्कारासाठी बोलवण्यात येईल. इंटरव्यूह या भरती प्रक्रियेचा शेवटला राउंड असेल. उमेदवार GEN / OBC / PwBD / EWS याशी संबंधित आहे, त्यांना 600 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. एससी / एसटी उमेदवारांसाठी शुल्क रक्कम 100 रुपये इतकी आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती