✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Sambhaji Maharaj Powada छत्रपती संभाजी महाराज पोवाडा
Webdunia
गुरूवार, 13 मे 2021 (18:45 IST)
तुळापुरी कैद झाला वीर, धर्मभास्कर, खरा झुंजार,खरा झुंजार,
संभाजी हो छावा शिवाजीचा, तिलक देशाच्या सौभाग्याचा
शिपाई भगव्या झेंडयाचा जी जी जी जी
बालपनी भुकेल्या वाघाला उभा फाडला,
ठार ज्यान केला वीर तो तुरुंगात बसला
औरंगजेब खद्खदुन हसला
आणा म्हणे सामने काफरालाजी जी जी
जखडडनी बेड्या पायाला, खेचून डोर दंडाला
महाराणा तिथे आणिला, ताठायात पुढे येउन वीर ठाकला
बेफिकिर चेहरा पाहून शाहा गांगरला जी जी जी
तबियत हाय का ठीक आपकी बोले कपटाने
होकाराची मान हलवली शूर मराठ्याने
बच्चे जैसा तू है मुझको समझ बात मेरी
जब मानोगे कहना मेरा दूंगा सरदारी
भुवया चढवून संभाजीने कथिले मग त्याला
काय सांगता बोला आलमगीर स्पष्टपने बोला
पथर पूजा करनेवाला धर्म छोड तेरा
आणि प्यारा खुदाका धर्म इस्लामी लेले तू मेरा
भडकला संभाजी मानी जीभ चावुनि
बोले गर्जुनी प्यारा तुझा धर्म असेल तुजला
माझा ही धर्म प्यारा मजला
धर्मासाठी मरीन प्रसंगाला जी जी जी
रागाने जाहला लाल, डोळे इंगळ ,दुनावले बळ
फुगविता दंड दुबळे ठरले बंद सारे तटातट तुटले
शिपाई सारे गडबडले जी जी जी
चटपटे बादशहा मनी, तेज पाहुनी, आवाज चढवुनि
बोले परी उसन्या अवसानान,अरे संभाजी कुत्त्याच्या मरशील मौतिन
बोलू नको मान उंचावुन जी जी जी
संभाजी वीर चेतला, चावून ओठ बोलला
थेरडया आवर जिव्हेला, संभाजी कोण वाटला ?
तुझ्यासारख्या दिन दुबळ्याला, मराठ्याच्या पुजलय पाचवीला
आणि मरणाचा आम्हावर लळा, ये जरा सामने हिरवा खातोतुलाजीजी जी
काफरा म्हणे शंभूला, ह्या क्षणी मारिन तुला
शेवटच्या ऐक वचनाला, हो मुसलमान समयाला
जीवदान देवूनी करीन सरदारतुलाजी जी जी
संभाजी हसून बोलला,
सरदारी ठेव शिलकेला नाहीतर वाट कोल्ह्या कुत्र्याला
तुझी बेटी देवून मला जावाई जरी त्वा केला
लाथेच्या ठोकरीन उडविन त्या मोहालाजी जी जी
काटा याची जीभ उमटले शब्द बादशहाचे
हाती भाले धरून धावले गुलाम तुकडयाचे
जीभ कापन्यापूर्वी छावा सिंहाचा वदला
” हिन्दू धर्म की जय ” तयाचा नाद नभी भरला
जिव्हा तुटली, वाचा मिटली तरी नयन त्याचे
पेटपेटुनी सांगत होते बीज मराठ्याचे
डोळे ही काढा याचा, जाहला हुकुम शहाचा जीर हाजीरर जी जीजी
अंगात खुपसले भाले धरणीवरराजा लोळेजीरहाजीररजीजीजी
जिवाची विझली ज्योत, राहिले तेज दुनियेत, तेज दुनियेत हा जी जी जी
धर्मासाठी पाचप्राण ते पणास लावावे
संभाजिचे नाव अमर ते नंतर मग घ्यावे
तुलापुरी त्या धर्मवीराच्या समाधीच्या वरती
अमर पिराजी हीच लावितो मिनमिनती पणती
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
स्वराज्य रक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज
पक्ष्यांपासून शिकण्यासारखे
परशुराम कोण होते? हैराण करणारे तथ्य जाणून घ्या
धर्मवीर संभाजीराजे यांच्याबद्दल 10 महत्त्वाच्या गोष्टी
श्रुश्रूषा हा असें भला दैवी गुण...
सर्व पहा
नक्की वाचा
गुरु पौर्णिमेला दत्तगुरूंची पूजा करण्याची संपूर्ण पूजा विधी, लागणारे साहित्य जाणून घ्या
गुरु पौर्णिमेला साईबाबांची पूजा करण्याची संपूर्ण पूजा विधी, लागणारे साहित्य जाणून घ्या
या भाज्यांमध्ये जिरे घालू नये; चव खराब होते
उपवासाची स्वादिष्ट बटाटा मखाना भाजी
हे 7 योगासन शरीराला रबरासारखे लवचिक बनवतील, जाणून घ्या
सर्व पहा
नवीन
मुंबईत 'सिंदूर पूल'चे उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तो भारतीय लष्कराला समर्पित केला
LIVE: मुंबईत 'सिंदूर पूल'चे उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तो भारतीय लष्कराला समर्पित केला
‘...आता थांबायला हवे’, मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदींना निवृत्तीचे संकेत दिले?
'गर्भपात' झाल्याने निराश झालेल्या तरुणाने माजी प्रेयसी आणि तिच्या मैत्रिणीच्या ६ महिन्यांच्या चिमुकलीचा गळा चिरडला
१ लाख कोटींचा 'मेकअप' बिघडला, गडकरी-फडणवीस जबाबदार! काँग्रेसचा टोला
पुढील लेख
1 जूनपर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश, हे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली