या जोडप्याने शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये झहीर खान आपल्या मुलाला मांडीवर घेतलेले दिसत आहे, तर सागरिकाने झहीरच्या खांद्यावर हात ठेवला आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये, झहीर त्याच्या मुलाचा हात धरलेला दिसतो
ग्रे-स्केल इमेज शेअर करताना या जोडप्याने लिहिले की, “तुमच्या प्रेमाने, कृतज्ञतेने आणि देवाच्या आशीर्वादाने, आम्ही आमच्या मुलाचे या जगात स्वागत करतो.” यानंतर पोस्ट अभिनंदनाच्या संदेशांनी भरली.
माजी क्रिकेटपटू आरपी सिंग, सूर्यकुमार यादव यांच्या पत्नी देविशा शेट्टी, अभिनेत्री डायना पेंटी, माजी क्रिकेटपटू राहुल शर्मा, क्विंटन डी कॉक यांच्या पत्नी साशा डी कॉक, अभिनेत्री हुमा कुरेशी, वीरेंद्र सेहवाग यांच्या पत्नी आरती सेहवाग यांनीही कमेंटद्वारे झहीर आणि सागरिका यांचे अभिनंदन केले आहे.