आम्ही सर्व तुझ्यासोबत, मोहम्मद शमीच्या ट्रोलर्सना राहुल गांधींचं उत्तर

Webdunia
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (08:59 IST)
भारत-पाकिस्तान सामन्यातल्या पराभवानंतर सोशल मीडियावर मोहम्मद शमीला ट्रोल करण्यात येतंय. राहुल गांधींनी ट्वीट करत शमीला पाठिंबा दिलाय.

<

Mohammad #Shami we are all with you.

These people are filled with hate because nobody gives them any love. Forgive them.

— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 25, 2021 >राहुल गांधी ट्वीटमध्ये म्हणतात, "मोहम्मद शमी आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. या लोकांना कोणी प्रेम दिलंच नसल्याने या लोकांची मनं द्वेषाने भरलेली आहेत. त्यांना माफ कर."

क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेंनीही शमीवर टीका करणाऱ्यांना सुनावलं आहे.

<

Jo log Mohammad Shami ke baare mein ghatiya baaten kar rahe hain, unse meri ek hi vinanti hai. Aap cricket na dekhen. Aur aapki kami mehsoos bhi nahi hogi. #Shami #355WicketsforIndia.

— Harsha Bhogle (@bhogleharsha) October 25, 2021 >ट्वीट करत हर्षा भोगलेंनी म्हटलंय, "मोहम्मद शमीबद्दल घाणेरड्या गोष्टी करणाऱ्यांना माझी एक विनंती आहे. तुम्ही क्रिकेट पाहणं सोडून द्या. तुमची कमी भासणार नाही."