वानखेडेंवर आरोप करणारे प्रभाकर साईल यांच्या आई हिरावती यांचा मोठा गौप्यस्फोट;

मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (08:35 IST)
मागील काही दिवसांपासून मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी वेगवेगळे खुलासे होत आहे. काल आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणामध्ये किरण गोसावी  याचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल  याने खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा गौप्यस्फोट केला. मात्र, आता प्रभाकर साईल यांच्या आईनं त्याहून मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला  आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

प्रभाकर साईलबाबत त्यांची आई हिरावती साईलनं धाक्कादायक दावे केल्याचे समोर आले आहे. याबाबत एका वृत्तवाहीनीने वृत्त दिले आहे. प्रभाकर हा गेल्या 4 महिन्यांपासून आमच्या संपर्कात नसल्याचं हिरावती साईल यांनी म्हटले आहे. प्रभाकर कुठे राहतो, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रभाकरच्या आईन वृत्तवाहिनीला सांगितले, प्रभाकरला मी काय सांगणार, तो कुठे राहतो ते आम्हाला काहीही माहिती नाही. मागील चार महिन्यांपासून त्याने आमच्याशी संपर्कही केलेला नाही. आमच्याशी बोललेला नाही.तसंच त्यांने आमची विचारपूसही केलेली नाही. तसेच कधी त्याने आम्हाला पाच पैसे दिलेले नाहीत.त्याचं आमच्याशी काही देणंघेणं नाही. येथे घरात असलेले कपडालत्ता तो घेऊन गेलाय, आता आमच्या इथं त्याचं काहीही नाही. त्याने जे गौप्यस्फोट केले त्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नसल्याचे हिरावती यांनी  सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती