U19 महिला आशिया चषक 2024: मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे प्रथमच होणाऱ्या 19 वर्षाखालील महिला आशिया चषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 15 सदस्यीय भारतीय महिला संघाची कमान निक्की प्रसाद यांच्या खांद्यावर असेल. सानिका चाळकेला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. भारत 15 डिसेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. शबनम शकीलचा देखील भारतीय महिला अंडर-19 संघात समावेश करण्यात आला आहे.
यजमान मलेशियासह एकूण सहा संघ या स्पर्धेत सहभागी होत असून, त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारतीय अंडर-19 महिला संघ पाकिस्तान अंडर-19 आणि नेपाळ अंडर-19 महिला संघासह अ गटात आहे तर ब गटात बांगलादेश अंडर-19, श्रीलंका अंडर-19 आणि मलेशिया अंडर-19 महिला संघाचा समावेश आहे.
सहापैकी चार संघ सुपर-4 मध्ये प्रवेश करतील आणि त्यांचे गुण आणि निव्वळ धावगती पुढील फेरीतही नेली जाईल.
U19 महिला आशिया कप 2024 साठी भारतीय संघ
निक्की प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (यष्टीरक्षक), भाविका अहिरे (यष्टीरक्षक), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी धृती, आयुषी शुक्ला आनंदिता किशोर, शबनम शकील आणि नंदना एस.