उमेश यादवची सर्वोत्तम कामगिरी
उमेश यादवने पहिल्या डावात 88 धावात 6 बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली तर दुसर्या डावात त्याने 45 धावात 4 गडी टिपले. असे एकूण उमेशने 133 धावात सामन्यात 10 गडी टिपले. हैदराबादच्या मैदानातही भारतीय गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याआधी झहीर खानने न्यूझीलंडविरुद्ध 2010 साली 68 धावांत 4 बळी घेतले होते.
* वेस्ट इंडीजचे दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद होण्याची ही सातवी वेळ ठरली.
* वयाच्या 18 व्या वर्षी भारतासाठी विजयी धाव काढणारा पृथ्वी शॉ सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.