क्रोएशियाचा नायजेरियावर विजय

सोमवार, 18 जून 2018 (10:43 IST)
नाजेरियाचा खेळाडू ओगेनेकारो इटेबो याने केलेला स्वयंगोल आणि लुका मोड्रीक याने पेनल्टी स्पॉटवरून केलेला गोल यामुळे क्रोएशियाने नाजेरिाचा 2-0 असा पराभव केला आणि विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. 
 
मध्यांतरास काही मिनिटे शिल्लक असताना ओगेनेकारो याने स्वयंगोल केला. त्यामुळे क्रोएशियाला मध्यांतरास 1-0 अशी आघाडी मिळाली. त्यानंतर 71 व्या मिनिटास स्पॉट किकवरून मोड्रीकने जाळीचा निशाणा साधाला व क्रोएशियाचा विजयावर शशिक्कामोर्तब केले.
 
मध्यांतरापर्यंत दोन्ही संघामध्ये अटीतटीचा खेळ सुरू होता. 62 व्या मिनिटाला अहमद मुसा हा नाजेरियाच्या अलेक्स इवोबी याच्या जागी मैदानात उतरला. 66 व्या मिनिटास क्रोएशियन बॉक्समध्ये व्हिक्टर मोसेस आला. परंतु, रेफ्रीने नायजेरयाच्या बाजूने निर्णय दिला नाही. 
 
70 व्या मिनिटास क्रोएशियाला पेनल्टी मिळाली. नायजेरियाच्या विलियम इकोंग याने मारिओ मांडझुकीक याच्याविरुध्द खेळताना फाऊल केला. त्यामुळे रेफ्रीने विलियमला पिवळे कार्ड दाखविले. लुका मोड्रीकने या संधीचा लाभ घेत गोल केला. त्यानंतर दोन्हीही संघांनी गोल करण्याचे प्रयत्न केले; परंतु त्यांना शय मिळाले नाही. क्रोएशियाच्या संघाने नायजेरियाचा संघ गोल करू शकणार नाही याची काळजी घेतली. नायजेरियाच्या गोलरक्षकाने क्रोएशियाचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरविले.
 
ड गटातील पहिल्या सामन्यात नवख्या आइसलँडने मेस्सीच्या अर्जेंटिना संघास 1-1 असे बरोबरीत रोखले. त्यानंतर क्रोएशियाने नायजेरियाला हरवत ड गटात तीन गुणांसह अव्वल स्थान घेतले.
 
आइसलँडचा गोलरक्षक हानेस पोर हालडोरसन याने अर्जेंटिनाचा गोल थोपविला व त्याने मेस्सीची पेनल्टी निष्फळ ठरविली. नायजेरियाचे प्रशिक्षक गेरनॉट रोहर यांनी आपला संघ बचावात कमकुवत पडला हे मान्य केले. पुढील आठवड्यात होणार्‍या सामन्यात अर्जेंटिनाला क्रोएशियाविरुध्द व नायजेरियाला आइसलँडविरुध्द विजय आवश्यक बनला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती