DC vs RR : सुपर ओव्हरमध्ये राजस्थानने ११ धावा केल्या होत्या, पण दिल्लीने फक्त चार चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीकडून केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स मैदानात आले आणि स्टब्सने षटकार मारून दिल्लीला विजय मिळवून दिला.
तसेच बुधवारी अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२५ च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. सुपर ओव्हरमध्ये राजस्थानने ११ धावा केल्या होत्या, पण दिल्लीने फक्त चार चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीकडून केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स मैदानात आले आणि स्टब्सने षटकार मारून दिल्लीला विजय मिळवून दिला. २०२२ नंतर पहिल्यांदाच आयपीएल सामन्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे लागला आहे. या विजयासह दिल्ली संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला. सहा सामन्यांत पाच विजय आणि एका पराभवासह त्यांचे १० गुण आहे. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा रेकॉर्ड चांगला आहे.