आयपीएल 2025 च्या हंगामाची सुरुवात पराभवाने करणाऱ्या गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि राजस्थान रॉयल्स पुन्हा विजयी मार्गावर येण्याच्या प्रयत्नात असतील. केकेआर आणि राजस्थान यांच्यातील आयपीएल 2025 चा सामना26 मार्च रोजी म्हणजेच बुधवारी गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. टॉस त्याच्या अर्धा तास आधी, म्हणजे संध्याकाळी 7:00 वाजता होईल.
पहिल्या सामन्यात कोलकाताला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) कडून पराभव पत्करावा लागला, तर सनरायझर्स हैदराबादने राजस्थानचा पराभव केला. राजस्थान संघ त्यांच्या नियमित कर्णधाराशिवाय खेळत आहे. गेल्या सामन्यात संजू सॅमसन एक प्रभावी खेळाडू म्हणून मैदानात आला होता आणि तो या सामन्यातही तीच भूमिका बजावू शकतो.
राजस्थान आणि केकेआर यांच्यात बरोबरी आहे. दोन्ही संघांच्या समोरासमोरील सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान आणि केकेआर यांच्यात एकूण 29 सामने झाले आहेत ज्यात दोन्ही संघांनी 14-14 सामने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णीत राहिला.
जर राजस्थान संघाला पुनरागमन करायचे असेल तर त्यांच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. सनरायझर्सविरुद्धच्या मागील सामन्यात, त्यांचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने चार षटकांत 76 धावा दिल्या तर फजल हक फारुकी आणि महेश थिकशाना देखील फलंदाजांना रोखण्यात अपयशी ठरले.
केकेआर आणि राजस्थानचा संभाव्य प्लेइंग-11 पुढीलप्रमाणे
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, महेश टिक्षणा, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी.
केकेआर: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष रघुवंशी, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन/अॅनरिच नोर्टजे, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.