या सामन्यात गुजरातचे सर्व गोलंदाज महागडे ठरले. तर, 20 षटके फलंदाजी केल्यानंतर, गुजरात टायटन्स संघाला 5 गडी गमावून फक्त 232 धावा करता आल्या. गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 74 धावा केल्या. त्याच्याशिवाय जोस बटलरने 54 धावांची खेळी केली. पंजाबकडून अर्शदीप सिंगने गोलंदाजीत 2 बळी घेतले.
मंगळवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबने श्रेयस अय्यर आणि शशांक सिंग यांच्यातील 81* धावांच्या भागीदारीच्या जोरावर20 षटकांत पाच गडी गमावून 243 धावा केल्या. आयपीएलमधील पंजाबची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
श्रेयस अय्यर या हंगामात पंजाबचे नेतृत्व करत आहे. त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात शानदार कामगिरी केली आणि 42 चेंडूत97 धावा करत नाबाद राहिला. यादरम्यान, त्याने230.95 च्या स्ट्राईक रेटने पाच चौकार आणि नऊ षटकार मारले. यासह, उजव्या हाताच्या फलंदाजाने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला. तो कोणत्याही संघाचा कर्णधार म्हणून पदार्पणात सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला.