रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांच्या अर्धशतकांमुळे, चेन्नई सुपर किंग्जने (CSK) मुंबई इंडियन्स (MI) ला चार विकेट्सने हरवून विजयाने सुरुवात केली. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत नऊ गडी गमावून 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात, सीएसकेने 19.1 षटकांत सहा गडी गमावून 158 धावा केल्या आणि सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 155धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक 31 धावा केल्या. शेवटी, दीपक चहर15चेंडूत 28 धावा करून नाबाद परतला. चेन्नईकडून नूर अहमदने 4 विकेट्स घेतल्या. तर खलील अहमदने 3 विकेट्स घेतल्या. सीएसकेने हे लक्ष्य 19.1 षटकांत पूर्ण केले. चेन्नईकडून रचिन रवींद्रने 45 चेंडूत 65 धावा करत नाबाद राहिला. तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याच्याशिवाय कर्णधार ऋतुराज गायकवाडने 26चेंडूत 53 धावांची शानदार खेळी केली.