आशुतोष शर्माच्या अर्धशतकामुळे दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा एका विकेटने पराभव करून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. सोमवारी विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, लखनौने निकोलस पूरन आणि मिशेल मार्श यांच्या स्फोटक अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकांत आठ गडी गमावून 209 धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्लीने 19.3 षटकांत नऊ गडी गमावून211 धावा केल्या आणि सामना जिंकला.
ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा यांनी सूत्रे हाती घेतली. दोघांनीही दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. स्टब्स 22 चेंडूत 34 धावा काढून बाद झाला तर आशुतोष 66 धावांवर नाबाद राहिला. तो शेवटपर्यंत उभा राहिला आणि सामना जिंकणाऱ्या कामगिरीने संघाचा विजय निश्चित केला. त्याच्याशिवाय दिल्लीकडून विप्राज निगमने 39, मिचेल स्टार्कने 2, कुलदीप यादवने 5 आणि मोहित शर्माने 1 धावा केल्या. लखनौकडून शार्दुल, सिद्धार्थ, दिग्वेश आणि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
कर्णधार म्हणून 50 वा टी-20 सामना खेळण्यासाठी आलेला लखनौचा कर्णधार ऋषभ पंत खाते न उघडताच बाद झाला. कुलदीप यादवच्या चेंडूवर डू प्लेसिसने त्याला झेलबाद केले. या सामन्यात लखनौकडून आयुष बदोनीने चार, शाहबाज अहमदने नऊ आणि डेव्हिड मिलरने 27* धावा केल्या. पंत व्यतिरिक्त शार्दुल ठाकूर आणि रवी बिश्नोई यांनी एकही धाव घेतली नाही. दिग्वेश राठी खाते न उघडता नाबाद राहिला. दिल्लीकडून मिचेल स्टार्कने तीन आणि कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या. याशिवाय विपराज निगम आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक यश मिळाले.