RIP वासूदेव परांजपे यांचे निधन

सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (16:57 IST)
ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक वासूदेव परांजपे यांचे 82व्या वर्षी निधन झाले आहे. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड या महान क्रिकेटपटूंची कारकिर्द घडवण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. सुनील गावसकरांना सनी हे टोपननाव त्यांनीच दिले. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि निवड समितीचे सदस्य जतीन परांजपे यांचे ते वडील होते.
 
मुंबई आणि बडोद्याकडून 29 फर्स्ट क्लास क्रिकेटचे सामने खेळणाऱ्या परांजपे यांनी नंतरचे त्यांचे सर्व आयुष्य क्रिकेट प्रशिक्षणासाठी ठेवले. मोठा क्रिकेटपटू ओळखण्याची नजर त्यांच्याकडे होती. त्यांनी राहुल द्रविडला वयाच्या 14 व्या वर्षीच तू भारताकडून खेळशील, पण त्यासाठी विकेटकिंपगपेक्षा बॅटींगवर अधिक फोकस कर, असा सल्ला दिला होता.
 
परांजपे यांचा हा सल्ला द्रविडनं मानला. त्यानंतर पुढे जे घडले तो इतिहास आहे. त्यांच्या निधनानं क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. भारतीय क्रिकेटचा द्रोणाचार्य हरपला अशी भावना या निमित्तानं व्यक्त होत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती