भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळला जात आहे. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्माने भारताचा महान अष्टपैलू आणि माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला.त्याने ओली रॉबिन्सनच्या चेंडूवर षटकार लगावत कपिल देवला मागे सोडले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत रोहित चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. या सामन्यापूर्वी कपिल देव आणि रोहित शर्मा संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर 61 षटकारांसह होते.
रोहित शर्माने आता कसोटीत 62 षटकार ठोकले आहेत. वीरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्याने 104 कसोटी सामन्यांमध्ये 91 षटकार ठोकले आहेत.एमएस धोनी 90 कसोटी सामन्यांमध्ये 78 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. 200 कसोटी सामन्यांमध्ये 69 षटकारांसह तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितकडे आता कसोटी क्रिकेटमध्ये 62 षटकार आहेत आणि त्याने कपिल देव यांना (61 षटकार) मागे सोडले आहेत.