भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या त्याच्या फॉर्मशी झगडत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी रहाणेला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले होते. तथापि, बीसीसीआयने त्यामागे हॅमस्ट्रिंगचे कारण सांगितले. प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्यानंतर आता रहाणेकडून कसोटीतील उपकर्णधारपदही हिरावून घेतले जाऊ शकते. बीसीसीआय आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रहाणेच्या जागी कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करू शकते. या साठी टी-20 कर्णधार रोहित शर्मा चे नाव आघाडीवर आहे. बीसीसीआय लवकरच याची घोषणा करू शकते.
कर्णधार रहाणेने सहा सामने खेळले असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने एकही सामना गमावला नाही, तर चार जिंकले आहेत. मात्र खराब फॉर्ममुळे आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याच्याकडून उपकर्णधारपदाची जबाबदारी काढून घेतली जाऊ शकते. केएल राहुल आणि रोहित शर्मा हे कसोटी संघात उपकर्णधारपदाचे प्रबळ दावेदार आहेत. पण रोहितला उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते, असे वृत्त आहे. भारत 17 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.