भारताने पाकिस्तानचा सहा विकेट्सनी पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर पाकिस्तानचा संघ 49.4 षटकांत 241धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात, भारताने 42.3 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. विराट कोहलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 51 वे शतक झळकावले.
शाहीन एकामागून एक वाईड गोलंदाजी करत होता. 43 व्या षटकात भारताला विजयासाठी चार धावांची आवश्यकता होती आणि कोहलीला शतक करण्यासाठी पाच धावांची आवश्यकता होती. ४३ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कोहलीने एक धाव घेतली. मग पुढच्याच चेंडूवर अक्षरने एक धाव घेतली. विराटने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले आणि भारताला विजय मिळवून दिला
भारताचे दोन सामन्यांनंतर चार गुण आहेत, तर पाकिस्तानला दोन सामन्यांमध्ये खाते उघडता आलेले नाही. आता पाकिस्तानचा एकमेव सामना बांगलादेशविरुद्ध आहे. तर, सोमवारी न्यूझीलंडचा सामना बांगलादेशशी होईल. जर किवी संघाने हा सामना जिंकला तर बांगलादेश आणि पाकिस्तान दोन्ही संघ बाहेर पडतील.